चोपडा, प्रतिनिधी | चोपडा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस (आय) व रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) तसेच मित्रपक्षाचे उमदेवार जगदीशचंद्र रमेश वळवी हे आपले नामनिर्देशन पत्र मंगळवार १ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जगदीशचंद्र वळवी हे उद्या मंगळवार १ ऑक्टोबर रोजी आघाडीतर्फे चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी गो. भि. जिनिंग फॅक्टरी, सुंदरगढी रोड येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आघाडीतर्फे करण्यात आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत वळवी आपला अर्ज दाखल करणार आहेत.