विभक्त दाम्पत्यातील वाद मिटवण्यात यश

parola firate adalat

पारोळा प्रतिनिधी । तामसवाडी येथील दाम्पत्य गेल्या दोन-तीन वर्षापासून कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत होते. मात्र आज या दाम्पत्यांमधील वाद मिटविण्यात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरते लोक न्यायालयाचे न्यायाधीश प्र.ग.महाळंकर आणि वकील संघाला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तामसवाडी येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोक न्यायालयात एक खटला चालविण्यात आला. गेल्या दोन-तीन वर्षापासून कौटुंबिक वादातून पती-पत्नी काही कारणास्तव विभक्त राहत होते. तो वाद मिटविण्यात लोक अदालत आपल्या दारी यांच्यात पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश प्र.ग.महाळंकर व पारोळा वकील संघाला यश आले आहे. या दोघांनी सुखाने संसार करण्यास तयार झाले असून यांनी एकमेकांना पेढा भरविला आणि सुनेला आपल्या घरी नांदवण्यासाठी घेऊन गेले. यानंतर बऱ्याच मान्यवरांनी कायद्याविषयी माहिती व सल्ला ग्रामस्थांना दिला. शेवटी अध्यक्षीय भाषण हे पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश प्र.ग. महाळंकर यांनी केले.

यावेळी ॲड.आनंदराव पवार, ॲड. सतीश पाटील, ॲड.उज्वल मीसर, ॲड.ए.आर बागुल, ॲड.महेंद्र पाटील, ॲड.पी.बी. ठाकरे, ॲड विशाल महाजन, ॲड.व्ही.डी.महाजन, ॲड.भूषण माने, ॲड.गणेश मरसाळे, ॲड.ए.डी. पाटील, ॲड.ए.डी कश्यप, ॲड.प्रतिभा मगर, ॲड.कृतिका आफ्रे, ॲड.स्वाती शिंदे, नायब तहसीलदार वंजारी, कृषी अधिकारी सुरेश लांडगे यांच्याबरोबर गावातील माजी सरपंच हिरामण पवार, राजधर पवार, भरत पाटील व इतर बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल पवार, सुनील बिरारी आणि प्रभाकर भोई यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.तुषार पाटील तर प्रस्तावना ॲड. वाय.एस.मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.एच.एम कुलकर्णी यांनी मानले.

Protected Content