मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर

raj thakre

मुंबई, वृतसेवा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांचे नावे जाहीर केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूकीत उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

नरेंद्र पाटील यांच्यासह  नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील असं यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केलं. राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार यांना पक्षप्रवेश देतांना त्यांची उमेदवारीही जाहीर केली. नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी गेल्यावर्षी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, त्यांचा उपचारादरम्यान २८ जानेवारीला निधन झालं होतं. नरेंद्र पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर केलं नसलं तरी ते धुळ्यातूनच लढतील अशी आशा आहे. तर नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही आज मनसेमध्ये प्रवेश केला. दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. मात्र त्यांनी कालच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

Protected Content