


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. महायुती सरकारच्या काळातील घोटाळे आणि खोट्या आश्वासनांचा जनतेपुढे पर्दाफाश करण्याचा उद्देश या यात्रे मागे आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले आहे. राज्यातील अनेक उद्योक राज्याबाहेर गेले आहे. मोजक्या उद्योगपचींची भरभराट झाली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व राज्यकर्ते उघड्या डोळ्यांना पाहत बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.


