जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी यावेळी आंतरेन्द्रिये व त्याची कार्ये , ज्ञानेंद्रिये व त्याची कार्ये , कपडे व त्याचे प्राकार , मूळ स्रोत कोणता ? , हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण कसे होते.छोटे आजार व त्यावर घरगुती उपचार , दिवस आणि रात्र कसे होतात? हवेतील ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, पृथ्वीभोवती हवेचे आवरण इत्यादी विषयांवर आपले प्रयोग व प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.