जळगाव प्रतिनिधी । शहरातील अर्चीत पाटील याला गेल्यावर्षी संशोधानासाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कोरोनामुळे डिजीटल स्वरूपात पुरस्कार देण्यात आला होता. आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते देशातील बाल शौर्य विजेच्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन या प्रकारात घेण्यात आला. यात जळगावच्या अर्चीत राहूल पाटील याला गेल्या वर्षी संशोधनासाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी गेल्यावर्षी अर्चीतला डिजीटल स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले होते. आज सोमवारी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले.