अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २:२५ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मुलगी घराचा काम सुरू असलेल्या ठिकाणी वडिलांना चहा देण्यासाठी गेल्या असताना हि घटना घडली. त्यावर घरच्यांनी तिला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. यावर चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content