Home क्राईम गोलाणी मार्केटमधील व्यापाऱ्याला स्वस्तात मालाचे आमिष दाखवत गंडवले

गोलाणी मार्केटमधील व्यापाऱ्याला स्वस्तात मालाचे आमिष दाखवत गंडवले

0
104


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्याला स्वस्तात माल देण्याचे आमीष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन खात्यात वर्ग करायला लागून माल न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी येथील रहिवासी सचिन रंगनाथ देशपांडे (वय-४३) यांचे गोलाणी व्यापारी संकुलात व्यवसाय आहे. सचिन देशपांडे यांना भोपाळ येथील व्हेरटेक्स होम केअर इंडस्ट्रीजच्या अभिलाश शर्मा या मालकाने स्वस्त दरात माल पुरवण्याचे आमीष दाखवुन देशपांडे यांना १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्याचे सांगीतले. १२ मार्च २०२१ ते २४ मे २०२१ दरम्यान पैसे वर्ग करुनही माल दिला नाही. याबाबत देशपांडे यांनी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देत होता.  अखेर देशपांडे यांनी रविवारी २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अभिलाश शर्मा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक रविंद्र सोनार करत आहेत.

 

 


Protected Content

Play sound