दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगारांची नागपूर पोलीसांकडून कसून चौकशी

arrest 2 696x447

जळगाव प्रतिनिधी | शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरात श्यामनगरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या असलेल्या चार जणांच्या टोळीला रामानंदनगर पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध अमरावती, नागपूर पोलीस स्थानकात शंभरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नागपूर जिल्ह्यातील परतवाडा येथील पोलीस रामानंद पोलीसात दाखल झाले आहे. चारही आरोपींनी आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्याची कसून चौकशी केली जात आहे.

शहरातील श्यामनगरात घरफोडी करण्यासाठी आली असल्याचा संशय 22 मे रोजी स्थानिक नागरिकांना आल्यानंतर रामानंदनगर पोलीसांना माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या अधारे रामानंदनगर पोलीस स्थानकातील किरण धनगर, नीलेश सूर्यवंशी व रवी पाटील यांनी रात्री साडेनऊ वाजता शेख जावेद शेख भुरू (वय ४० रा.हनुमाननगर नागपूर), रुतिक भास्कर जाधव (वय १९ रा.नूतन वसाहत जालना), नसीम अब्दुल हाफीज (वय-25, खरबी नगर, नागपूर), शेख छोटू शेख दिलावर (वय-39) रा. बाग पिंपळगा, बीड या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

शेख जावेद, अब्दुल हाफीज व छोटू शेख हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. चौघांची कसून चौकशी करण्यासाठी नागपूरातील परतवाड्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंग चव्हाण पो.कॉ. जयसिंग चव्हाण हे रामानंद पोलीसात दाखल झाले आहे. परतवाडा पोलीसांनी सकाळपासून ताब्यात घेतले असून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्याची माहिती घेत होते. दरम्यान 22 मे रोजी चारही जण नागपूरहून सुरतला जात असतांना त्यातील दोघांना गावठी दारू पिण्यासाठी जळगावला सायंकाळी 7 वाजता उतरले होते. त्यामुळे सोबत असलेले इतर दोघेही त्यांच्यासोबत जळगाव रेल्वे स्थानकात उतरले होते. दरम्यान दारू पिल्यानंतर त्याचे एका नागरीकांशी दारू पिल्यावरून हातपायी झाली होती अशी माहिती एका आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले. चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी केलेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परवाडा पोलीसा आरोपींना ताब्यात घेणार
22 मे रोजी सायंकाळी संशयीत रित्या श्यामनगरमध्ये फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येक 50 ठिकाणी दरोडा टाकून घरफोडी केली असल्याची माहिती समारे आल्यानंतर तातडीने रामानंद नगर पोलीसांनी नागपूर पोलीसांशी संपर्क साधून चौघांची माहिती देण्यात आली. या चौघांनी नागपूर परीसरात धाडसी दरोडा टाकून सुमारे 20 लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला असल्याचे सांगण्यात आले. नागपूरातील परतवाडा पोलीस स्थानकांचे पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंग चव्हाण आणि पोकॉ जयसिंग चव्हाण यांनी शहरातील रामानंद नगर पोलीस गाठून चारही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान चौघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांना उद्या नागपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content