Home Cities बोदवड नाथाभाऊ हे रबरासारखे चिकट ! – खडसे

नाथाभाऊ हे रबरासारखे चिकट ! – खडसे

0
52

बोदवड प्रतिनिधी । काही जणांना वाटले की, आता खडसे काही प्रचाराला येत नाहीत, पण नाथाभाऊ हे रबरासारखे चिकट असल्याची मिश्कील टिपण्णी एकनाथराव खडसे यांनी येथे केली.

काही दिवसांपर्यंत मुंबई येथे रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे नुकतेच घरी परतले आहेत. आल्यानंतर ते लागलीच प्रचारात सक्रीय झाले आहेत. बोदवड येथील एका मेळाव्यात त्यांनी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांंना वाटले की आता नाथा भाऊ प्रचाराला येणार नाही, पण नाथाभाऊ रबरा सारखा चिकट आहे. विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही. नाथाभाऊने ओडिए योजनेद्वारे घराघरात पाणी पोहचवले व उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २ वर्षात प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचले. बोदवड शहराच्या विविध कामांसाठी १२ कोटी रुपये आणले व शहराचा विकास केला, असे एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, आज भुसावळ येथे नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात एकनाथराव खडसे नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound