मुलींमध्ये नाशिक तर मुलांमध्ये पुणे विभागाने पटकाविले सुब्रतो चषक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिक विभागाने मुंबईचा ६-० तर मुलांमध्ये पुणे विभागाने मुंबईचा ५-३ ने(पेनल्टी) पराभव करीत सुब्रातो चषक पटकाविला.

विजयी व उपवीजयी संघांना पोलीस अधीक्षक एस राजकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्याहस्ते चषक व पदक देण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष सचिव फारुक शेख, सहा नियोजन अधिकारी राहुल इदे, प्रा.डॉअस्मिता पाटील ,प्रा डॉ. अनिता कोल्हे, अडव्होकेट आमिर शेख,अब्दुल मोहसीन यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आली.

यावेळी वंशिका माटे,नागपूर, सोडियम ब्रू,पुणे,जहान मिस्त्री,मुंबई, चींखाई लांबा, कोल्हापूर व  अरहम अगरवाल यांना देण्यात आली. या स्पर्धेतील विजयी उपविजय संघातील खेळाडूंना वैयक्तिक सुवर्ण व रजत पदक सहित चषक तसेच प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला पदक व ट्रॉफी जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन, पींचं बॉटलिंग व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे देण्यात आली.

स्पर्धा यशस्वीतेसाठी  फारुक शेख यांच्या नेतृत्वात अब्दुल मोहसीन यांच्या मार्गदर्शनाखाली अरबाज खान, अर्जुन सनस,आकाश पाल वसीम शेख,पंकज तिवारी, राहीलअहमद , आकाश कांबळे, सुरज सपके,कौशल पवार,धनंजय धनगर, अरशद शेख, कुलदीप पाटील,आशुतोष शुक्ला दीपक सस्ते, अयान शेख, संजय कासेकर व नीरज पाटील यांनी पंच म्हणून कामगिरी पार पडली.

 

Protected Content