यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांची बिनविरोध निवड
यावल येथील यावल तालूका खरेदी-विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाची आज अनेकांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत भाजपाचे नारायण चौधरी यांची जागा बिनविरोध झाली आहे. १६ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
२४ जानेवारी २o२४ गुरूवार रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ८४ उमेदवारापैकी ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान इतर मागासवर्गीय गटातून भारतीय जनता पक्षाचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नारायण चौधरी हे बिनविरोध विजयी झाले आहे.
यावल खरेदी विक्री सहकारी संघाची दिनांक ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर व माघारीनंतर
या निवडणुकीत एकुण १६ संचालकांच्या निवडीसाठी दोन हजार ८७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४५ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात शेतकी संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघासाठी पाच जागांसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
सोसायटी मतदार संघाच्या ७ जागांसाठी २४ अर्ज, अनुसुचित जाती-जमातीच्या १ जागासाठी ३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. ओबीसी मतदारसंघाच्या १ जागासाठी १२ अर्ज, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या १ जागासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल आहे. अनुसुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ५ अर्ज प्राप्त झाले आहे. महिलांच्या राखीव २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले आहे. सहाय्यक निबंधक सहकार संस्था कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर मोरे हे निवडणूक निर्णय अधिकारी हे काम पहात आहे.