ऑक्सिजन सिलिंडरसाठी यावल तालुक्यातील शिक्षकांचा निधी संकलनाचा पुढाकार !

 

यावल / भुसावळ : प्रतिनिधी । यावल  तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकानी फैजपूरच्या जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय  येथे  covid-19  सेंटरला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर खरेदीसाठी  चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये  जमा केले  ही  रक्कम तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली

 

यावल तालुक्यात फैजपूर येथे  जे  टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात   covid-19 सेंटरसाठी  ड्युरा सिलिडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवण्यासाठी रकमेची आवश्यकता होती  यावलचे गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील , गटशिक्षणाधिकारी  नईम शेख  यांनी तालुक्यातील सर्व जि प तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाना स्वेच्छेने देणगी द्यावी यासाठी आवाहन केले होते . या  आवाहनाला प्रतिसाद देत तीनच दिवसात   शिक्षकांनी   चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये (4,05,815) जमा करून  मदत केली

 

एवढी मोठी रक्कम मदत करण्याचे कार्य जिल्ह्यातून प्रथमच यावल तालुक्यातील शिक्षकांनी केलेले आहे. ही  रक्कम यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्याकडे  पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर  पाटील यांच्या हस्ते आज  सुपूर्द  करण्यात आली. याप्रसंगी डॉ.निलेश पाटील ( गटविकास अधिकारी) , नईम शेख ( गटशिक्षणाधिकारी) ,प्रमोद कोळी (गटसमन्वयक), योगेश इंगळे , इम्तियाज फारूकी, कुंदन फेगडे  आणि कुंदन वायकोळे  आदी  उपस्थित होते.

 

सर्व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख  यांनी आभार मानले आहेत

 

कोरोनाबाधीत रूग्णांची वाढती संख्या बघता फैजपुर विभागाचे प्रांत कैलास कडलग यांनी रुग्णांची भटकंती व गैरसोय होवु नये या दृष्टीकोणातुन लोकसहभागातुन ५० ऑक्सीजन बेडचे सेन्टर उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे हे ऑक्सीजन सेन्टर तात्काळ उपलब्ध करण्यासाठी सामाजीक कार्यकर्त व दानसुरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले होते

 

Protected Content