मुक्ताईनगर प्रतिनिधी | मौजे वडाळी (नांदुरा) येथे रावेर लोकसभेच्या खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मुलभूत सुविधा योजने अंतर्गत तसेच राज्यसभा खासदार अजेय संचेती यांच्या खासदार निधीतून मंजूर सामाजिक सभागृहाचे खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष संतोष मुंडे, पं.स.सभापती सुनिताताई डिवरे, बलदेवराव चोपडे, विद्याताई वक्टे, सोपान वक्टे एकनाथ पाटील, देवलाल पाटील, शालिग्राम पाटील तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.