पत्रकार आनंद शर्मा यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा; युवासेनेचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरात असलेल्या मार्कल कॅफेत अश्लील चाळे होत असल्याने पोलीसांनी कारवाई केली होती. याची बातमी प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार आनंद शर्मा यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्कल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने धडक कारवाई केली होती. या कारवाईत कॅफेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित कॅफे चालकावर कारवाई

देखील करण्यात आली. आपल्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कारवाईचे प्रत्येक स्तरातून कौतुक होत आहे. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. तदनंतर ज्येष्ठ पत्रकार संपादक आनंद शर्मा यांना सदर विडीओ वृत्त युटयूब तसेच त्यांच्या पोर्टलवरून हटविणे संदर्भात तसेच न हटविल्यास कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन आले. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगीरी व दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमकी देण्यात आली त्या मोबाईल नंबरची सखोल चौकशी करून त्या व्यक्तीवर तसेच संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सहसचिव विराज कावडीया, युवा जिल्हाधिकारी शिवराज पाटील, युवा उपजिल्हाधिकारी पियुष गांधी, युवती सेनेच्या उपशहराधिकारी वैष्णवी खैरनार, युवाधिकारी महानगर स्वप्निल परदेशी, विशाल वाणी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content