जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण स्मशानभूमीजवळ असलेल्या प्रमुख नाल्याच्या साफसाफाईच्या कामाला आज बुधवारी सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या निचरा लवकर व्हावा यासाठी साफसफाई करण्यात येत असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी पाहणीला उपस्थित होते. मेहरूण परिसरात हाकेच्या अंतरावर मेहरूण तलाव आहे. पावसाळ्यात हा मेहरूण तलाव ओव्हरफ्लो होत असतो. तलावातून पाण्याचे निचरा होत असतांना नाल्यात अडथडा निर्माण झाल्यास मेहरूण परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी घुसून नुकसान होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मेहरूण परिसरातील सांडपाण्याचा मुख्य नाला असल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने आजपासून नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलूभूषण पाटील यांनी मेहरूण परिसरातील नागीकांशी संवाद साधला.
नागरीकांनी घंटागाडी गेल्या तीन दिवसांपासून येत नसल्याची तक्रार केली. त्यावर स्वच्छता विभागाचे अधिकारी यांनी तातडीने घंटागाडी या परिसरात पाठवावी आणि गटारी स्वच्छतेच्या सुचना देण्यात आल्यात. तर काही भागात विद्यूत तारा लोंबकलेल्या असल्यामुळे महावितरण कडे वारंवार तक्रार केली तरी महावितरण अधिकारी यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार केली. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलवून पावसाळ्यापुर्वी एका इलेक्ट्रिक पोलची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2118121391677580