रामटेक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. रामटेक मतदारसंघ हा काँग्रेसला सोडल्यामुळे ठाकरे गटाचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे यांनी बंड करून ते २७ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हा मतदारसंघ अनूसूचित जातीसाठी राखीव आहे.
सध्या रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघावर पहिला हक्क शिवसेनेचा आहे. मात्र वाटाघाटीत महाआघाडीतील काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्यात आला. त्यामुळे शेकडो शिवसैनिक नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे सुरेश साखरे बसपाचे प्रदेशाध्यक्ष होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढले आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरच आपण रिंगणातून माघार घेऊ, अन्यथा नाही असे सुरेश साखरे यांनी स्पष्टपणे सांगितले.