रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे निधन

कोलकाता-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मिशनचे सध्या असलेले अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च रोजी मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय ९५ वर्ष होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. २९ जानेवारीला त्यांची प्रकृती खालावल्याने स्वामी स्मरणानंद यांना रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ३ मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे रात्री ८.१४ वाजता निधन झाले. ते रामकृष्ण मठ आणि मिशनचे १६ वे अध्यक्ष होते.

स्वामी स्मरणानंद यांचा जन्म १९२९ मध्ये तमिळनाडूच्या तंजावर येथील अंदमी गावात झाला. रामकृष्ण पंथाशी त्यांचा पहिला संपर्क वयाच्या २० व्या वर्षी झाला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता. १७ जुलै २०१७ रोजी स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानंतर ते अध्यक्ष झाले होते.

Protected Content