मु.जे.महाविद्यालयात शास्त्रीय गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

fdsfsdfds

‌जळगाव प्रतिनिधी । जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयात शास्त्रीय गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बहिणाबाई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख पं.संजय पत्की, शशिकांत वडोदकर, नितीन नाईक व सुवर्णा नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला.

पं.संजय पत्की यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा व्यक्त केले.या स्पर्धेचे परीक्षण नासिक येथील ज्ञानेश्वर कासार आणि डॉ.आशिष रानडे यांनी केले.या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक चाळीसगाव -आशुतोष सूर्यवंशी तीन हजार रूपये, द्वितीय क्रमांक जालना येथील प्रतीक साळुंके दोन हजार रूपये, तृतीय क्रमांक जळगाव श्रुती वैद्य एक हजार रूपये, उत्तेजनार्थ प्रथम मालेगाव राधिका पाटील पाचशे रूपये, आणि उत्तेजनार्थ द्वितीय श्रुती नेहेते पाचशे रूपये, ‌मोठ्या गटात प्रथम क्रमांक जालना येथील भक्ती पवार 7 हजार रूपये, द्वितीय क्रमांक जळगाव मयुरी हरीमकर 5 हजार रूपयेतृतीय क्रमांक जळगाव विजय पाटील तीन हजार रूपये, उत्तेजनार्थ प्रथम स्वानंद देशमुख, प्रशांत सोळंकी प्रत्येकी 700 रूपये मात्र. ‌स्पर्धेचे सूत्रसंचालन ईशा वदोडकर यांनी केले.प्रा.कपिल शिंगाणे यांनी सर्वांचे आभार मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.देवेंद्र गुरव आणि संगीत विभागातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Protected Content