चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

चैन्नई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | कुख्यात चंदन तस्कर डाकू वीरप्पन यांची मुलगी विदया राणी लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. ती तामिळनाडूमधील तमिलर कांची म्हणजचे एनटीके या पक्षाची उमेदवारी आहे. ती आधी भाजपमध्ये होती परंतू तिने भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. विदया राणी वकील आहे. २०२० मध्ये ती भाजप पक्षात दाखल झाली होती. त्यावेळी तिला भाजप युवा मोर्चाची उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. परंतू ती आता तामिळनाडूमधील अभिनेता सीमांन यांच्या एनटीके पक्षात आहे. तिला कृष्णागिरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कायद्याचे शिक्षण घेतलेली विद्या राणी कृष्णागिरीमध्ये एक शाळा चालवते. तिने बंगळूरमधूनच कायद्याची पदवी घेतली आहे.

विद्या राणी तिचे वडील वीरप्पन यांना फक्त एकदाच भेटली आहे. एनटीके प्रमूख सीमन यांनी तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील ४० जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार आहेत. तामिळनाडूत तमिलर काची या पक्षाने प्रथम २०१६ मध्ये निवडणूक लढवली. त्यावेळी या पक्षाला केवळ १.१टक्के मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळाली. २०२१ मधील विधानसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण ६.७ टक्के गेले. त्यावेळी व्होट शेअरमध्ये ही तिसरी सर्वात मोठी पार्टी होती.

Protected Content