मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ संगीतकार खय्याम (वय ९२) यांचे सोमवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांच्या निधनाने एक महान संगीतकार काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त होत आहे.
खय्याम यांच्यावर गत काही दिवसांपासून सुजय रुग्णालयात उपचार सुरू होते. येथेच त्यांना तीव्र हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती प्रसिद्ध गझल गायक तलत अझिज यांनी दिली. खय्याम यांनी लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. कभी कभी, उमरावजान, नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारख्या चित्रपटांमधील त्यांनी दिलेली गाणी प्रचंड गाजली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यंस्कार होणार आहेत.