बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले- कंगना

शेअर करा !

मुंबई– अभिनेत्री कंगना राणावत हिने मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टात जाणाऱ्या तिन्ही खानांसह बॉलिवूड दिग्गजांवर तोंडसुख घेत, बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले, अशी टीका केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा इंडस्ट्रीवर जोरदार टीका केली आहे. बेजबाबदार, अपमानास्पद वृत्तांकन करणा-या दोन टीव्ही वाहिन्यांविरोधात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर यांच्या विरोधात या सर्वांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. याच मुद्यावर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला.

या व्हिडीओत काही वर्कर्स फिल्मच्या सेटवर काम करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने मीडियाविरोधात कोर्टात जाणा-यांना लांडग्यांची उपमा दिली आहे. ‘बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र आलेत आणि आता मीडियावर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. मजुरांवर, शेतक-यांवर, महिलांवर, देशातील गरिबांवर अन्याय होतो, त्यावेळी हे लोक कुठे जातात? आज ही मंडळी मानवाधिकाराच्या बाता मारताहेत, पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा हे मूग गिळून गप्प बसतात,’ अशा शब्दांत कंगनाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!