टिकटॉकवर पठाण दाम्पत्याची धमाल; चाहत्यांची जोरदार दाद ( व्हिडीओ )

सातारा प्रतिनिधी । टिकटॉक या सोशल व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपवर सुलेमान पठाण आणि त्यांची पत्नी रूखसाना पठाण या दाम्पत्याने अक्षरश: धमाल केली असून त्यांच्या व्हिडीओजनी धुमाकुळ घातल्याचे दिसून येत आहे.

टिकटॉक या सोशल व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपने अलीकडच्या काळात अनेकांना वेड लावले आहे. यात शॉर्ट व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा मिळत असून याला अतिशय मनोरंजक पध्दतीने शेअर करता येते. विशेष करून कुमारवयीनांवर या अ‍ॅपने गारूड केल्याचे आधी स्पष्ट झाले होते. तर अलीकडच्या काही महिन्यांमध्ये टिकटॉक हे अ‍ॅप सर्व वयोगटात लोकप्रिय झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे अगदी खेड्यापाड्यातील हुरहुन्नरी कलावंतांचा हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य लोक या माध्यमातून स्टार बनत असल्याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. यात सातारा जिल्ह्यातील वाघोली कोरगाव येथील पठाण दाम्पत्याचा समावेश करावा लागणार आहे. कारण ही जोडी टिकटॉकवर सर्वाधीक लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून आता ओळखली जाऊ लागली आहे.

सुलेमान पठाण आणि त्यांची पत्नी रूखसाना हे टिकटॉकवर मराठी आणि हिंदी भाषेतील गाणी, विनोद आदींवर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांना तब्बल १२ लाख फॉलोअर्स मिळालेले असून त्यांच्या व्हिडीओजला तब्बल चार कोटींपेक्षा जास्त लाईक्सदेखील मिळालेले आहेत. सुलेमान पठाण हे व्यवसायाने शेतकरी असून ते आपल्या स्मार्टफोनवर व्हिडीओ तयार करून याला शेअर करत असतात. टिकटॉकने त्यांना उदंड प्रसिध्दी दिली आहे. यामुळे त्यांना समाजात चांगला सन्मानदेखील मिळू लागला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांना काही जाहिरातींच्या असाईनमेंट मिळाल्या असून चित्रपटासाठी ऑफरदेखील आलेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे स्वत: मुस्लीम धर्मीय असले तरी ते अनेकदा हिंदूंचे सण आणि वेशभूषेत व्हिडीओ शेअर करत असून याला जबरदस्त प्रसिध्दी मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर त्यांनी आपल्या प्रोफाईलवर आपण सातारकर असल्याचे अभिमानाने नमूद केले आहे.

खाली पहा पठाण दाम्पत्याचे निवडक व्हिडीओज.

@suleman_mh11

🚩 जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना आम्हा दोघांकडून हार्दिक शुभेच्छा..🌹 आम्ही आपलेच सातारकर..☺️☺️

♬ original sound – __paams__

@suleman_mh11

पावटा तोडणी चालू आहे..☺️ आपल्याला आवडतो का..? आम्ही आपलेच सातारकर, आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा. 😍

♬ original sound – tushkipilla1212.satarkar

@suleman_mh11

🛴 तुम्हाला येते का सायकल चालवायला..??😃 आम्ही आपलेच सातारकर आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा..😊😊😍😍

♬ original sound – rahul_tarte_official

@suleman_mh11

|| विठ्ठल विठ्ठल जय हरी || आम्ही आपलेच सातारकर आवडल्यास नक्की लाइक आणि फॉलो करा..🥰☺️☺️☺️

♬ original sound – Neha Gire500

@suleman_mh11

होळी सणाच्या सर्व बंधू भगिनींना आम्हा दोघांकडून हार्दिक शुभेच्छा..! आम्ही आपलेच सातारकर, आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा..☺️🌹☺️

♬ original sound – Shivani Sarkar

Protected Content