पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शरद माेहाेळ यास हल्लेखाेरांच्या हल्लयात एक गाेळी शरीरावर लागली होती. त्यास उपचारासाठी सहयाद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्याचा प्राणज्योत मालवली. काेथरुड पोलिस ठाण्याचे वरिेष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी माहिती दिली. तर मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे.
शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हल्लेखाेर यांनी शरद माेहाेळ यास काेथरुड परिसरातील सुतारदरा मध्ये पाठलाग करत गाठले. त्यानंतर थेट हल्लेखाेरांन साेबत आणलेल्या पिस्तुलमधून गाेळी माेहाेळ याच्या दिशेने झाडली.
शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला जामीन मंजूर केला होता.
यामध्ये माेहाेळ जखमी हाेऊन खाली काेसळला त्यानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरुन घाईगडबडीत पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच, काेथरुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आराेपींचा शाेध सुरु केला आहे. त्याचसाेबत गुन्हे शाखेचे पोलिस देखील काेथरुड मध्ये दाखल हाेऊन त्यांनी हल्लेखाेरांचा माग काढणे सुरु केले. पूर्ववैमनस्यातून सदरचा गाेळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या शरद माेहाेळ याने माेठया प्रमाणात सामाजिक कार्यक्रम सुरु केल्याने त्याचे राजकीय पुर्नवसनची चर्चा सुरु झाली हाेती.