रावेर कब्रस्तानात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पालिकेचा हजारोचा दंड


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरालगतच्या कब्रस्तानात अवैध वृक्षतोड प्रकरणी रावेर नगरपालिकेने ४७ हजार ८२७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदार अ. अकील अ. शकील यांनी नगरपालिकेच्या वन विभागाकडे वृक्षतोडीची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नगरपालिकेने युसुफ खान यांच्यासह इतर संबंधितांकडून खुलासा मागितला होता. त्यानंतर वन विभागाने तोडण्यात आलेल्या झाडांचे मूल्यांकन केले.

मूल्यांकनाच्या आधारे नगरपालिकेने दंड ठोठावला आहे.ही कारवाई तस्करांसाठी धक्कादायक ठरली असून नगरपालिकेने अशा कारवाया भविष्यातही करण्याचा इशारा दिला आहे.