जळगाव-राहूल शिरसाळे । जळगाव शहरातील नागरीकांना रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी नागरी सुविधा देण्यास महापालिका असमर्थ ठरत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरात गेल्या चार वर्षांपासून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधांपासून नागरीकांना वंचित ठेवण्यात येत आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व प्रभागातील कॉलन्यांमधील रस्त्यांची स्थतीत अत्यंत खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून जिवीत व शारीरिक त्रास सहन कराव लागत आहे. जळगाव शहरातील सर्व रस्त्यांची कामे मंत्री व पालकमंत्री यांच्या निकटवर्तीयांना देवून १ वर्षापेठा अधिक काळ लोटला गेला तरी देखील कामांना सुरूवात करण्यात आलेली नाही. शहरातील रस्त्यांची कामे एकाच मक्तेदाराना दिले असून कामाची गुणवत्त टिकवू शकत नसल्याने दोन ते तीन महिन्यात रस्ते खराब होत आहे. तरी शहरातील रस्ते, गटारी इतर कामे त्वरीत सुरू करावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, यशवंत पाटील, किरण राजपूत यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1909688449374348