एकनाथ शिंदे आधीच कॉंग्रेसमध्ये जाणार होते ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत उभी फूट पाडून मुख्यमंत्रीपद मिळविले असून आता ते शिवसेनेचे चिन्हा आणि एकूणच मालकी हक्कासाठी सुप्रीम कोर्टात लढा देत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना शिवसेनेने आपल्याला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले होते असा दावा केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते असे ते म्हणाले.

याच्या पाठोपाठ आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे हे १५ आमदार घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. ते म्हणाले की, शिंदे हे कधीही शिवसेनेला दगा देऊ शकतात हे सर्वांना आधीच माहिती होते. ते १५ आमदारांसह कॉंग्रेस सोबत जाणार होते. तथापि, काही बाबींमुळे ते शक्य न झाल्याचे खैरे म्हणाले.

 

 

Protected Content