भडगावात भाजपाला पुन्हा धक्का

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा भडगाव मतदारसंघातील किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकजण शिंदे गटात प्रवेशाचा सिलसिला जोमात सुरू असून नुकतेच आ. भडगाव शहरात किशोर पाटील यांनी भाजपला पुन्हा धक्का दिला आहे. भाजप महिला आघाडीच्या भडगाव शहराध्यक्षा सीमा महाजन यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.

आ. किशोर पाटील यांच्या विकास कामांनी आपण प्रभावित झालो असून आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात जनसेवा करणार असल्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. आ. किशोर पाटील यांच्या ‘शिवालय’ निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, भडगाव शहर प्रमुख योगेश गंजे, महेंद्र ततार, नितीन महाजन, राहुल महाजन, बंटी तहसीलदार, प्रवीण ब्राह्मणे, आदींची उपस्थिती होती. दरम्यान सीमा महाजन यांचे सोबत भडगाव शहरातील मेनका महाजन, रत्ना पाटील, आश्विनी सातव, श्वेता ततार, मीना महाजन आदींनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

आगामी काळात भडगाव शहरासह तालुक्यातील महिलांचे सक्षम संघटन अधिक मजबुत करत लोकाभिमुख कामे करून जनतेच्या मनात शिंदे गटा विषयी विश्वास निर्माण करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त करत सर्वांचे शिंदे गटात स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र ततार यांनी तर उपस्थितांचे आभार नितीन महाजन यांनी मानले .

Protected Content