मुक्ताईनगरात महावितरणचा ‘दांडिया’ ! विजेच्या लपंडावामुळे संताप

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवरात्रोत्सव ऐन भरात आलेला असतांना मुक्ताईनगर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू असून यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या नवरात्र सुरू असून मुक्ताईनगर शहरात ठिकठिकाणी दांडीयाचे आयोजन करण्यात येत आहे. नवरात्रीच्या भक्ती व उत्सव पर्वात सर्व जण मग्न होत असतांना महावितरण कंपनी यावर अक्षरश: विरजण टाकण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

नवरात्र सुरू झाल्यापासून दररोज रात्री नऊ ते अकराच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू असल्याने भाविक व विशेष करून तरूणाईमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज रविवार असल्याने मोठ्या संख्येने तरूण-तरूणी दांडिया खेळण्याच्या मूडमध्ये असतांना शहरातील बर्‍याच भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. किमान नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तरी अखंड विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content