पोलीस प्रशासन हप्तेखोरीने बरबटले-खडसेंचा आरोप

eknath khadse

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस प्रशासन हप्तेखोरीने बरबटले असल्याचा आरोप करून आपण याबाबत दोन दिवसांआधीच अधिक्षकांना पुरावे दिले असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

हिंगोणा गावाजवळ झालेल्या अपघातात बारा जणांचा बळी गेल्याच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले की, मुक्ताईनगर-भुसावळ ते जळगावपर्यंत महामार्गाने आल्यास प्रत्येक मिनिटला अंगावर येणारे वाळूचे डंपर नजरेला पडतात. धक्का जरी लागता तरी समोरच्या वाहनातील लोकांचा जीव जाईल, ऐवढा त्यांचा वेग असतो. पोलिसांना माहिती असूनही यावर कारवाई होत नाही. किती दिवस केवळ अपघात मोजत बसायचे. सर्वाधिक अवैध व्यवसाय मुक्ताईनगर तालुक्यात सुरू आहेत. मध्य प्रदेशाची सीमा असल्याने तिकडून गंजा, दारू, अफू, गुटखा सर्रासपणे जिल्ह्यात येतो. गायी, बैल, म्हशी सारखे जनावरांचीदेखील तस्करी येथूनच चालते. पोलिस विभागात असलेल्या हप्तेखोरीचे आकडेदेखील आपण पोलिसांच्या तोंडून पोलिस अधीक्षकांना ऐकवल्याचे ते या वेळी म्हणाले.

Protected Content