Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरातील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राष्ट्रवादीत !

मुक्ताईनगरातील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राष्ट्रवादीत !

0
87

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे खडसे आणि पाटील गटात आरोप-प्रत्यारोग रंगले असतांनाच आज शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अलीकडच्या काळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज आमदार पाटील यांचे कट्टर समर्थक तथा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुक्ताईनगर शिवसेना_माजी_शहर_प्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा आणि आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, राजू माळी, प्रवीण पाटील, बापू ससाणे, विनोद सोनवणे, दीपक साळुंके, योगेश काळे, सोनू पाटील, संजू माळी, नंदू हिरोळे, प्रकाश खेवलकर, अप्पा नाईक, श्रवण पाटील आदी उपस्थित होते.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात बाळाभाऊ भालशंकर यांनी प्रवेश घेतला असून आता ते आमच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत.


Protected Content

Play sound