सकाळी आठ वाजेला पहाट कसे म्हणता ? – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन गेल्या अडीच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, पण विकासाऐवजी हेडिंगसाठीच बोलले जाते हे राज्याचे दुर्दैव असून, सकाळी आठ वाजताच्या शपथविधीला पहाटेचा शपथविधी कसे म्हणता? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बीकेसी सभेतील वक्तव्यावर उपस्थित केला.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो, जे केले ते उघडपणे केले, त्यांच्यासोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर मंत्री मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नसते तर भाजपावाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते,’ असा अप्रत्यक्ष टोला  भाजपसोबतच राष्ट्रवादीवर देखील  मुख्यमंत्र्यांनी लगावला.

विकासाऐवजी हेडिंगसाठीच बोलले जाते हे राज्याचे दुर्दैव
यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री वेळोवेळीच मी बोलणार असे सांगितले जात होते. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांना काय भूमिका मांडायची ती मांडू देत, यावर प्रतिकिया देण्यात देखील मला स्वारस्य नाही, मला योग्य वाटेल तेव्हा बोलणार, हे मागेच सांगितले होते. सरकार येऊन अडीच वर्ष झाले, सरकार त्याचे काम करते आहे, पण दुर्दैवाने विकासाच्या कामासंदर्भात बोलण्याऐवजी हेडिंगसाठीच बोलले जाते हे राज्याचे दुर्दैव आहे असेही पवार यांनी म्हटले आहे.

Protected Content