आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : उपजिल्हा रूग्णालयासाठी तब्बल २२ कोटींचा निधी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फलीत म्हणून यासाठी तब्बल २२ कोटी १४ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रूग्णालयाने कोविडच्या आपत्तीमध्ये केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले होते. शेकडो रूग्णांना यामुळे जीवदान मिळाले होते. याआधी येथे ५० खाटांची सुविधा होती. कोरोना पश्‍चातच्या काळात या हॉस्पीटलमध्ये १०० खाटांची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याला आता यश मिळाले असून या उपजिल्हा रूग्णालयाच्या वाढीव कामासाठी तब्बल २२ कोटी १४ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक व (नकाशे) आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: प्ररामा २०२२/प्र. क्र.१४४/आरोग्य ३ मुंबई ४००००१ दि.१८ नोव्हेंबर २०२२ अन्वये रूग्णालय मुख्य इमारत साठी १३५५.०५ लक्ष तर निवासस्थान साठी ८५८.५४ लक्ष इतक्या मोठ्या भरीव निधीसह अंदाज पत्रक व नकाशांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयात आता ५० ऐवजी १०० खाटांची सुविधा मिळणार असून याचा परिसरातील गोरगरीब रूग्णांना लाभ होणार आहे.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मतदारसंघातील चौफेर विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. एकीकडे पायाभूत सुविधांसह विविधांगी प्रकल्प मतदारसंघात आणण्याचा पाठपुरावा सुरू असून यातील अनेकांना मंजुरी मिळाली आहे. यासोबतच, महत्वाच्या असणार्‍या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले असून याचेच फलीत उपजिल्हा रूग्णालयासाठी मिळालेल्या भरीव निधीतून समोर आले आहे. भविष्यात या रूग्णालयात अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी आपले प्रयत्न राहतील असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: