राहुल गांधी संत गजानन महाराज यांच्या चरणी लीन !

शेगाव-अमोल सराफ | कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन येथेच महाप्रसाद देखील ग्रहण केला.

भारत जोडो यात्रे निमित्त कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे आले होते. संत नगरी मधे आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी वारकरी संप्रदायाची पावलीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर नंतर त्यांनी जाहीर सभेपूर्वी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावे संस्थांच्या वतीने त्यांना संपूर्ण मंदिर च्या वतीने राबविण्यात जाणार्‍या कार्याची माहिती करून दिली.

यावेळी खासदार राहुल गांधी यांनी एका सामान्य वारकर्‍या भक्ताप्रमाणे मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, उद्या सकाळी साडेसहा वाजता जलंब, भेंडवळ ,जळगाव जामोद मार्गे रविवारी दुपारी ३ वजता भारत जोडो यात्रा ही मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: