श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानींचे स्थान घसरले

मुंबई वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्सच्या शेअर्समध्ये घट झाल्याचा परिणाम अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. मुकेश अंबानी यांची जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीमध्ये आता पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन अब्जाधीश मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

पण, गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्सच्या शेअर्समध्ये घट झाल्याचा परिणाम अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. मुकेश अंबानी यांची जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीमध्ये आता पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट आणि टेस्ला व स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने अंबानी सातव्या स्थानी घसरले आहेत. मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 78.3 अब्ज डॉलर आहे. तर, इलॉन मस्क सहाव्या स्थानी असून 78.6 अब्ज डॉलर इतकी मस्क यांची संपत्ती झाली आहे.

बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार वॉरेन बफेट पुन्हा एकदा पाचव्या स्थानी आले आहेत. 79.5 अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती झाली आहे. 22 जुलै रोजी वॉरेन बफेट यांना मागे टाकत मुकेश अंबानी यांनी पाचव्या स्थानी झेप घेतली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती 75.1 अब्ज डॉलर इतकी होती, तर बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर इतकी होती.

फोर्ब्सच्या जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीमध्ये केवळ मुकेश अंबानी एकमेव आशियातील व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस 190 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अव्वल स्थानी कायम आहेत. तर, माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 114 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

Richest list, Mukesh Ambani, shares fall, fifth to seventh, business magazine Forbes, Warren Buffett, Tesla and SpaceX

Protected Content