ट्रम्प यांच्या विमानाचा अपघात टळला

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचा मोठा अपघात टळला. वॉशिंग्टन विमानतळावर आकाशात उडणारी एक ड्रोन सदृश्य वस्तू त्यांच्या विमानाच्या अगदी जवळून गेली. ट्रम्प यांचं एअरफोर्स वन हे विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना हा प्रकार घडला. यावेळी या विमानात अनेक जण होते.

रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी ट्रम्प एअरफोर्स वन लँड होत असताना पिवळ्या आणि काळ्या रंगाचं एक उपकरण उडताना विमानाच्या अगदी जवळ आलं होतं. ते विमानाच्या उजव्या बाजूला धडकणार होतं, मात्र हा अपघात थोडक्यात टळला.

उत्तर अमेरिकेतील हवाई सुरक्षा उपायांचे समन्वय साधणाऱ्या उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने आता सिक्रेट सर्व्हिसकडे अहवाल मागितला आहे. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकेच्या वायुसेनेकडे याबाबत विचारणा केली होती.

तसेच व्हाइट हाउसचं मिलिटरी ऑफिस आणि एअरफोर्सच्या ८९व्या एअरलिफ्ट विंगने सांगितलं की, “या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. पडताळणी केली जात आहे.

President of the United States, President Donald Trump of the United States, Air Force One, accident averted,

Protected Content