शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |रावेर लोकसभा क्षेत्रातील जामनेर विधानसभा मतदारसंघात शेंदुर्णी येथे खा. रक्षाताई खडसे यांनी भारतीय जनता पार्टीचे “गाव चलो अभियान” निमित्त स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेऊन आगामी निवणूक बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन भा.ज.पा.राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुचनेनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणविस तसेच भा.ज.पा.प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व गिरीष महाजन यांचे मार्गदर्शना खाली काल खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “गाव चलो अभियान” राबवितांना शेंदुर्णी (जामनेर) येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून भेट देऊन स्थानिक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक्ष संवाद साधून,महाविजय २०२४” साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा मिळण्यासाठी कामाला लागणे बाबत आवाहन केले.
यावेळी व्यास पिठावर खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह संजय गरूड, सागरमल जैन, गोविंद अग्रवाल, उतम थोरात, माजी नगराध्यक्ष विजया खलसे, शहर अध्यक्ष पंकज सुर्यवंशी, अमृत खलसे, शेख इमाम, प्रकाश झंवर, सौ.रंजना धुमाळ, नारायण गुजर, शांताराम गुजर, डॉ.किरण सुर्यवंशी, सुधाकर बारी, सुनील शिनकर,राजेंद्र भारुडे, काडोबा गुजर, निलेश थोरात,इच्छाराम राजपूत, सर्व माजी नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.