पक्षाने तिकीट दिल्यास आमदारकी लढणार – विशाल सोनार

sonar

 

एरंडोल प्रतिनिधी । पक्षाने जर मला तिकीट दिले, तर नक्कीच मी विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे मत मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी आज (दि.५) ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूूज’शी बोलतांना स्पष्ट केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मी गेल्या 2006 पासून आज पावतो पक्षासाठी पक्ष वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहतो. तालुक्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतो. तसेच त्यांच्या कुठल्याही प्रश्नासाठी कोणत्याही वेळी तत्पर असतो. जर मला पक्षाने तिकीट दिले, तर नक्कीच येत्या विधानसभा निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. तसेच पाहता गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा मतदारसंघात चांगली पकड असल्याचे दिसून आले होते. जर मला पक्ष अध्यक्षांनी तिकीट दिले, तर निवडणूक लढवेल, असे मत एरंडोल तालुका मनसे अध्यक्ष विशाल सोनार यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह असल्याने कार्यकर्तेमध्ये दिसत आहे. पक्षास गेल्या निवडणुकीत जो पराभव पाहायला मिळाला, तसेच आता होणार नाही. मनसे नक्कीच एक नंबरवर राहील असे देखील ते बोलताना म्हणाले.

Protected Content