शेंदुर्णी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी सहकार महर्षी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात हे प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमास लाभले या प्रसंगी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे पत्रकार अतुल जहागिरदार कार्यक्रमास उपस्थित होते. 

उत्तमराव थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्वामी विवेकानंदांचे विचार व आचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत. आपण उठा, जागे व्हा, व आत्मनिर्भर बना व प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिजाऊं प्रमाणे त्यागी व स्वामी विवेकानंदन प्रमाणे चारित्र्यवान बनले पाहिजेत. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पी टी खलचे होते  शिक्षिका हर्षदा अरगडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विषयी विचार व मनोगत मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डी. आर. पाटील सर यांनी केले .तर आभार प्रदर्शन उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री व्हि.के.वाघ सर यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यालयातील शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले .

 

Protected Content