खा. पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : कन्नड घाटाच्या विकासासाठी निधी मंजूर

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी   । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११  वरील येणाऱ्या औट्रम घाटातील नऊ किलोमीटरचा रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे. या खड्ड्यांमुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. या कन्नड घाटाच्या रुंदीकरणासह खड्डे बुजविण्याचे कामासाठी  खा. उन्मेष पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने २५ कोटी रुपये मंजूर झाले असून येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

औरंगाबाद व धुळे या जिल्ह्यांचा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील औट्रम घाटात नऊ किलोमीटरच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे. या खड्ड्यांमुळे दररोज वाहनांची कोंडी तर होतेच. परंतु ,आतापर्यंत खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातातून असंख्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही याकडे कोणाचेच लक्ष दिसून आले नाही. मात्र खा. उन्मेष पाटील यांनी सातत्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. आज त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून २५ कोटी रुपये मंजूर झाला  आहे. कार्यारंभाचे पत्र प्राप्त झाले असून येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. औट्रम घाटातील नऊ किलोमीटर रस्त्यासह घाटाच्या बाहेर दोन्हीं बाजूस सुमारे तीन- तीन  किलोमीटर मिळून  एकूण पंधरा किलोमीटर कामाचे रुंदीकरण इतर कामे केली जाणार आहे. घाटाच्या दुरूस्तीसाठी खा. उन्मेष पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या निधीच्या खर्चातून  नऊ किलोमीटरचा रस्तासह पंधरा किलोमीटर डांबरीकरण, घाटात नवीन  बॅरिकेट्स ,  पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची दुरूस्ती. खचलेल्या रस्त्यांची दुरूस्ती, जागोजागी दिशादर्शक फलक  यांमुळे घाट आकर्षक दिसणार आहे.

Protected Content