Home Cities जळगाव भाजपतर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत अंगणवाडी स्वच्छता व खाऊ वाटप उपक्रम

भाजपतर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत अंगणवाडी स्वच्छता व खाऊ वाटप उपक्रम

0
114

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव मधील नऊ मंडळामध्ये अंगणवाडी स्वच्छता व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत अंगणवाडी स्वच्छता व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यात  शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र अंगणवाडी अभियान प्रमुख उज्वला बेंडाळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी दीप्ती चिरमाडे, जिल्हा अंगणवाडी प्रमुख रेखा वर्मा यांच्या नेतृत्वात जळगाव मधील नऊ मंडळामध्ये अंगणवाडी स्वच्छता व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात मंडळ क्रमांक एक मध्ये ज्योती तिवारी,  उषा पाठक, मंडळ पाच छाया सारस्वत, मंडळ सहा उज्वला बेंडाळे, मंडळ आठ ज्योती बर्गे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घेतले.   याप्रसंगी  नगरसेविका गायत्री राणे, नगरसेवक महेश चौधरी, नगरसेविका मंगला चौधरी, सुरेखा तायडे यांचे  सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी  ज्योती राजपूत, सरोज पाठक, धीरज वर्मा यांनी कामकाज पाहिले.


Protected Content

Play sound