‘मोशन इन्स्टीट्युट कोटा’तर्फे स्पर्धा परिक्षांवर सेमिनार उत्साहात

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात नुकताच मोशन इन्स्टिट्युट कोटा यांच्यातर्फे नीट, जेईई, होमी भाभा सारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला सेमिनार नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी तज्ञांनी मार्गदर्शन करत ‘स्पर्धेच्या युगात स्माटनेसचा वापर करुन पुढे व्हा’ असे आवाहन केले.

विद्यार्थी व त्यांचे पालक कोणताही निर्णय घेताना उशीर करतात. हे स्पर्धेचे युग आहे. जेव्हा जेईई, नीट यासारख्या परीक्षा तुम्ही देतात त्या परीक्षेची स्पर्धा ही फक्त, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आपसात नसते तर राष्ट्रीय लेव्हलच्या परीक्षांची स्पर्धा देखील राष्ट्रीयच असते त्यामुळे आपली स्पर्धा हे सगळ्या विद्यार्थ्यांशी असून या स्पर्धेच्या युगात स्माटनेसचा वापर करुन आपण पुढे जायला हवे. यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे असल्याचे कोटा येथील शैक्षणिक तज्ञांनी मुलांना मार्गदर्शनात सांगितले.

या कार्यक्रमात मोशनचे कोटा येथील सह संचालक अमित वर्मा, मोशनचे maths विभागप्रमुख आतिष अग्रवाल कोटा, मोशनचे डायरेक्टर नितीन पाटील हे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आजच्या काळातील शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने, स्पर्धा याविषयी मुलांना सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक करीयर मध्ये आपले करीयर निवडतानाही कशी काळजी घ्यायची याविषयी सांगत विविध प्रकारच्या उदाहरणांसह मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करावी याबद्दल माहिती दिली.

त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांचे व्यक्तिमत्व देखील कशा प्रकारे चांगले होईल, मुलांमधील आत्मविश्वास वाढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी याविषयीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. नीट आणि जेईईत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपला अनुभव सांगितला. यावेळी मुलांचा उत्स्फुर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

सेमीनारमध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तर विजेत्यांना आयआयटी मुंबई व किंग एडवर्ड हॉस्पिटल, सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजला भेट देण्याची संधी मिळणार आहे. यावेळी माेशनच्या प्रमुख शैलजा पाटील, प्रदिप चव्हाण, अकॅडमिक हेड प्रियदर्शनी पाटील यांची उपस्थिती होती.

 

Protected Content