बोढरे येथून एकाची दुचाकी लांबविली!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील बोढरे येथील एकाच्या शेतात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेला नाही.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील कपूरचंद दिना जाधव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. दरम्यान ते आज शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांनी आपली सीबी शाईन कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीएच ९५२१) रस्त्याच्या कडेला चॅबीसहीत उभी केली. त्याचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने सदर मोटरसायकल लंपास केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जाधव यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र अद्याप मोटारसायकल मिळून आलेली नाही. तत्पूर्वी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे मुलगा लखन कपूरचंद जाधव यांनी सांगितले आहे.

Protected Content