परसाडे येथून तरुणी बेपता

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १९ वर्षीय तरुणी कोणालाही काही न सांगता निघून गेली असून तिच्या गावात शोध घेतला परंतु ती परत आली नाही. याबाबत यावल पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ‘किशोर सुरेश पाटील हे आई, वडील, पत्नी आणि चुलत बहीणीसह तालुक्यातील परसाडे येथे राहत असून खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज, शनिवार दि.२३ एप्रिल रोजी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास ते आणि पत्नी व १९ वर्षीय चुलत बहीण पायल प्रकाश पाटील असे घरी होते. तर वडील आणि आई शेतात गेले होते.

किशोर पाटील हे अभ्यास करत होते. दरम्यान तहान लागल्याने पाण्यासाठी  चुलत बहिणीला आवाज दिला परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पत्नी जागृतीला पायल संदर्भात विचारणा केली. ती घरात दिसून आली नाही म्हणून मी गावात जाऊन त्याबद्दल विचारपूस केली परंतु ती मिळून आली

गावात, आजूबाजूच्या परिसरात नातेवाइकांकडे पायल संदर्भात विचारपूस केली असता काही एक माहिती समोर आली नाही. त्यामुळे यावल पोलीस स्टेशनला पायलच्या हरवल्यासंदर्भात खबर देण्यात आली.

१९ वर्षीय पायल प्रकाश पाटील रा.परसाडे शरीराने सडपातळ, रंग गोरा, उंची पाच फूट 3 इंच, अंगात काळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे. सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

१९ वर्षीय तरुणी कोणालाही काही न सांगता निघून गेली असून तिच्या गावात शोध घेतला परंतु ती परत आली नाही. याबाबत यावल पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

Protected Content