विज तारांच्या शाॅर्ट सर्कीटमुळे २ हजार ३०० बाबुंची झाडे जळुन खाक

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तारखेडा बु येथील बाबुंच्या शेतास विज तारांच्या शाॅर्ट सर्कीटमुळे २ हजार ३०० बाबुंची झाडे जळुन खाक झाल्याची घटना घडली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महावितरणकडे आज दि. २३ एप्रिल रोजी अर्जाद्वारे केली आहे.

 

पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु शिवारात अविनाश विष्णु पाटील व सुनिता विष्णु पाटील यांची गट क्रं. ७७ / १ व गट क्रं. ७७ / २ ही शेतजमीन आहे. अविनाश पाटील यांनी १० एकर शेत जमिनीपैकी ७ एकर जमिन क्षेत्रात ४ वर्षांपूर्वी बाबुंची लागवड केली होती. सद्यस्थितीत बाबुंच्या झाडांची उंची २० ते २५ फुट झालेली आहे. दरम्यान, त्यांच्या शेतावरुन विज वितरण कंपनीच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. दि. २२ एप्रिल रोजी दुपारी विज तारांमध्ये शाॅर्ट सर्कीट झाल्याने ७ एकर मधील २ हजार ३०० बाबुंची झाडे जळुन खाक झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी अविनाश पाटील व सुनिता पाटील यांनी नुकसान भरपाई मिळावी तसेच भविष्यात असा प्रकार होवु नये म्हणुन आमच्या मालकीच्या शेतावरुन गेलेल्या विद्युत तारा इतरत्र हलविण्यात याव्यात अशी मागणी महावितरण कंपनीचे लोहटार येथील उपशाखा अभियंता यांना दि. २३ एप्रिल रोजी केली आहे.

Protected Content