Home क्राईम मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0
40

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले आहे. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.

भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे  दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले होते. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागाीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाण यांच्या सुचनेनुसार पथकाने कारवाई केली. यात संशयित आरोपी मोईद शेख अजीज (वय-२५) रा. खडका रोड, भुसावळ,  शेख रेहान शेख रशिद वय २८ रा. आयान कॉलनी भुसावळ आणि सैय्यद अक्रम सैय्यद हातम वय २३ रा. माटरागाव ता.शेगाव जि.बुलढाणा  यांना तिघांना अटक केली . त्यांच्याकडून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि हरीष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ सुनिल जोशी, पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ रमन सुरळकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोहेकॉ महेश चौधरी, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ निलेश चौधरी, पोकॉ सचिन चौधरी, पोकॉ जावेद शहा, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रणय पवार यांनी केली.


Protected Content

Play sound