मुलीसह आईला दगडाने मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील भारतनगर येथे मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावर मुलीसह तिच्या आईला दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की,  जळगाव शहरातील भारतनगर येथे आशाबाई बडगे या मुलीसह  वास्तव्यास अाहे. भारत नगरातच राहणार्‍या  काही तरुणांनी आशाबाई यांच्या मुलीची छेड काढली होती. १६ मार्च रोजी आशाबाई त्याचा जाब विचारला असता तरूणांनी घरात घुसून आशाबाई व त्यांच्या मुलीला दगडाने मारहाण करून दुखापत केली तर इतरही दोन ते तीन जणांनी मारहाण केली. अशा आशयाच्या आशाबाई बडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  गुरुवारी मोहन भालेराव, राजू भालेराव यशवंत भालेराव, बळवंत भालेराव, समाधान भालेराव (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. भारतनगर   या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.

 

Protected Content