दुचाकी चोरणारा भामटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली येथे दुचाकी चोरीच्या प्रयत्नांतील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. संशयित आरोपीला त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

गौरव ऊर्फ कटप्पा राजू कुमावत (वय-२९) रा. दत्तनगर पहूर, ता. जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना अजिंठा चौफुली येथे संशयित दुचाकी चोरीच्या प्रयत्नात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी , किशोर पाटील, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे योगेश बारी, मुकेश पाटील, चेतन सोनवणे, यांच्या पथकाने शुक्रवार १८ मार्च रोजी सकाळी तत्काळ घटनास्थळ गाठले. या ठिकाणी बनावट चावीचा वापर करत दुचाकी चोरीच्या प्रयत्नातील  संशयित गौरव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १८ मार्च रोजी सायंकाळी संशयित गौरव यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Protected Content