Home Cities पारोळा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना मातृशोक

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना मातृशोक

0
102

mankarnika patil parola nidhan

पारोळा प्रतिनिधी । माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मातोश्री मनकर्णिकाबाई पाटील यांचे पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

येथील गं.भा.मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील (९०) यांचे गुरुवारी पहाटे २:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दि.७ रोजी दुपारी ४:०० वाजता पारोळा येथील किसान महाविद्यालयात प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या दिवंगत आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या पत्नी; प्राचार्य उल्हासराव पवार, माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व माजी जि.प.सदस्य श्री.बाळासाहेब पाटील यांच्या मातोश्री तर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि जि.प.सदस्य रोहन पाटील यांच्या आजी होत.


Protected Content

Play sound