मुंबई वृत्तसंस्था । आधीच महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असतांना आता इतर पक्षातील काही आमदारांना कमी-जास्त निधी मिळत आहे, पक्षाचे नाव सांगणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह ११ आमदार नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन नाराज आहेत. यासंदर्भात “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.
अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली.